मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

बिहार, एमपीतून 7 गावठी पिस्तुले आणून ‎नांदेडला विक्री;स्थानिक गुन्हे शाखेने पाच जणांना केली अटक.

मध्य प्रदेशातील इंदूर येथील खडगाव व ‎‎बिहार राज्यातील काही जिल्ह्यांतून‎पिस्तूल आणून नांदेडमध्ये विक्री‎करणाऱ्या टोळीतील पाच जणांच्या‎स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या ‎‎आहेत. त्यांच्याकडून ७ पिस्तूल आणि‎११६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात‎आली. ही आतापर्यंतची सर्वात मोठी‎कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. ‎‎कमलेश ऊर्फ आशू पाटील बालाजी‎लिंबापुरे (२३, रा. वसरणी), बलबीरसिंग ‎‎शेरा (२१, रा.हिंगोली गेट नांदेड), शेख ‎‎शाहबाज शेख शकील (२३, रा. रहीमपूर ‎‎नांदेड), श्यामसिंघ मठवाले (२३, गेट‎नंबर २, नांदेड ) असे ताब्यात घेतलेल्या ‎‎आरोपींची नावे आहेत. यात एका‎अल्पवयीन आरोपीचा समावेश‎असल्याची माहिती आहे.‎

हे सर्व आरोपी नांदेडमधील आहेत.‎या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष‎सपुरे आणि गब्या हे दोघे जण फरार‎आहेत. विशेष म्हणजे, टोळीतील हे‎सर्व आरोपी बिहार, मध्य प्रदेश‎राज्यातून गावठी पिस्तूल आणून‎नांदेडमध्ये विक्री करत होते. २०२०‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎पासून ही टोळी सक्रिय होती. या‎गुन्हेगारीसाठी या शस्त्राचा वापर केला‎जात होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या‎पथकाने २ ऑक्टोबर रोजी गुप्त‎बातमीदाराकडून मिळालेल्या‎माहितीवरून वाघी ते नाळेश्वर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎जाणाऱ्या रोडवरील आरटीओ‎कार्यालयाजवळ टोळीतील सदस्यांना‎गावठी पिस्तूल विक्री करत असताना‎अटक केली. या वेळी या आरोपींनी‎पोलिसांवर हल्लादेखील केला होता.‎पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतल्यानंतर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎झाडाझडती घेतली. या वेळी‎त्यांच्याकडे सात पिस्तूल आणि ११६‎काडतूस आढळून आले. त्यांच्याकडून‎एकूण तीन लाख तीन हजार रुपये‎किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात‎आला.‎

काही वर्षांपासून सातत्याने शस्त्र खरेदी‎
मागील काही वर्षांपासून नांदेड शहरात पिस्तूल खरेदी-विक्रीचे‎प्रकार वाढले अाहेत. याबाबत पाेलिसांनी सांगितले की,‎पिस्तूल खरेदी करणारे बहुतांश जण भाईगिरी करण्यासाठी‎तसेच इन्स्टाग्रामवर फोटो, व्हिडिअाे टाकण्यासाठी अशा‎टोळींकडून पिस्तूलांची खरेदी करत असल्याचे प्राथमिक‎तपासात समाेर अाले अाहे. या प्रकरणात पाेलिस अधिक‎तपास करत असल्याचे पाेलिस सूत्रांनी सांगितले अाहे.‎

नांदेड जिल्ह्यात पिस्तूल खरेदी करण्याचा प्रकार सध्या वाढला आहे.‎मध्य प्रदेश व बिहार राज्यातून हे गावठी पिस्तूल व काडतूस आणून‎विकले जात आहेत. १० ते २० हजारांमध्ये या पिस्तूलांची खरेदी होत‎असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पिस्तूल खरेदी करणारे लोक‎त्यांच्या संपर्कातील इतरांना याची माहिती देतात आणि पिस्तूल विक्री‎करणाऱ्या टोळीकडून याची खरेदी होत असल्याचे प्राथमिक चौकशीत‎समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.‎

वरील आरोपींनी हैदराबाद येथे आशिष सपुरे व रबज्योतसिंघ ऊर्फ‎गब्या तिवाना (दोघे रा.नांदेड) यांनी नांदेड येथे मोठ्या प्रमाणात‎गावठी पिस्तूल पुरविण्याचे कटकारस्थान रचले होते. त्यासाठी‎आशिष सपुरे व गब्या तिवाना हे दोघेही पैसे पुरवित होते. या‎प्रकरणातील सपुरे आणि गब्या हे फरार असून पोलिसांनी माहिती‎देणाऱ्यांना २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, असे पोलिस‎अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.‎

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!