महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

महाराज सयाजीराव गायकवाड स्मृतिदिन

जन्म – ११ मार्च १८६३ (कवळाणे,नाशिक)
स्मृती – ६ फेब्रुवारी १९३९ (वडोदरा,गुजरात)

महाराज सयाजीराव गायकवाड यांचा जन्म नाशिक मधील कवळाणे गावी झाला. बडोद्याचे महाराजा खंडेराव गायकवाड यांच्या मृत्यू नंतर बडोद्याच्या राजघराण्यात ते दत्तक गेले आणि महाराजा म्हणून सिहासनावर आरूढ झाले. महाराजा सयाजीराव गायकवाड हे १८७५ ते १९३९ दरम्यान बडोदा संस्थानाचे राजे होते. न्यायव्यवस्था, ग्रामपंचायतीचे पुनरुज्जीवन, सक्तीचे प्राथमिक शिक्षण, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण, हरिजनांसाठी शाळा, अस्पृश्यता निवारण, संस्कृत ग्रंथ प्रकाशन, कला शिक्षणाची सोय अशा सुधारणा त्यांनी आणल्या. बालविवाह बंदी, स्त्रियांना वारसाहक्क, विधवा विवाह, कन्याविक्रय बंदी, पडदा पद्धती बंद इ. सुधारणा करून स्त्रियांना आधुनिक युगाचे दालन उघडून दिले. १८८६ मध्ये मुंबई येथील एका समारंभात त्यांनी ज्योतिबा फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी दिली. अशा या आदर्श राजाचे ६ फेब्रुवारी १९३९ रोजी निधन झाले. सयाजीराव गायकवाड महाराजांच्या पवित्र स्मृतीस दैनिक जागृत भारत तर्फे विनम्र अभिवादन

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!