
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत व्यस्त असल्यानं नार्वेकर यांनी ३ आठवड्यांची मुदतवाढ मागितली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रता प्रकरणी १५ फेब्रुवारीपर्यंत निकाल द्यायला सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुदतवाढ दिली आहे. मात्र आज झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठानं २ आठवड्यांची मुदतवाढ दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोग या आठवड्यात निकाल देण्याची शक्यता आहे. याप्रकरणी ३१ जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत