ऑस्ट्रेलियन खुल्या टेनीस स्पर्धेत,रोहन बोपण्णाने पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करुन रचला इतिहास…

रोहन आणि त्याचा जोडीदार मॉथ्यू एबडनने अर्जेंटिनाच्या गोंजालेज आणि अँड्रेस मोल्टेनी जोडीचा ६-४,७-६ असा पराभव केला. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनीस स्पर्धा २०२४ मध्ये,भारताच्या रोहन बोपण्णानं पुरुष दुहेरीत उपांत्य फेरीत प्रवेश करुन इतिहास रचला आहे. बोपण्णाने पहिल्यांदाच या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.वयाच्या ४३ व्या वर्षी उपांत्य फेरित प्रवेश करणारा तो एकमेव खेळाडू आहे. उपांत्य फेरीत त्यंचा सामना थॉमस मचाक आणि झिझेन झांग या ऑस्ट्रेलियाच्या जोडी बरोबर होणार आहे. या बरोबरच पुरुष दुहेरीतला तो प्रथम मानांकित खेळाडू ठरला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत