कोचिंग क्लाससाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नवीन मार्गदर्शन सूचना जारी

कोचिंग संस्था १६ वर्षापेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकणार नाही, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने कोचिंग क्लासेस अर्थात खासगी शिकवणीसाठी नवीन मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. दहाव्या इयत्तेनंतरच विद्यार्थ्यांची नावनोंदणी होऊ शकेल, असे मंत्रालयाने सांगितले आहे. कोचिंग संस्था पदवीपेक्षा कमी पात्रतेचे शिक्षक ठेऊ शकणार नाहीत, ते मुलांच्या नोंदणीसाठी पालकांची दिशाभूल करणारी आश्वासनं देऊ शकणार नाहीत, शाळेच्या वेळेत कोचिंग चालणार नाही, आदी सूचना मंत्रालयाने दिल्या आहेत. कोचिंग संस्थांच्या उपक्रमांच्या देखरेखीची जबाबदारी सर्व राज्य सरकारांची असेल, असे देखील या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत