सोलापुरात आज विविध विकासकामांसह ९० हजार घरांचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण…

हातमाग कामगार, पावर लूममधले कामगार, कचरा वेचक, बीडी कामगार, चालक वगैरे श्रेणीतल्या नागरिकांची ही घरं आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सोलापुरात प्रधानमंत्री शहरी आवास योजनेंतर्गत राज्यात तयार झालेल्या ९० हजार घरांचं लोकार्पण करतील. तसंच सोलापुरातल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेच्या १५ हजार घरांचंही लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राज्यातल्या पीएम स्वनिधी योजनेच्या १० हजार लाभार्थ्यांना कर्जाचा पहिला आणि दुसरा हप्ता दिला जाईल. राज्यात अमृत योजनेअंतर्गत उभारल्या जाणाऱ्या २ हजार कोटींच्या ८ प्रकल्पांचं भूमीपूजनही प्रधानमंत्री उद्या करतील. भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, शेगाव, सातारा, सांगली आणि चंद्रपूर जिल्ह्यातलं भद्रावती इथं हे प्रकल्प आहेत. याशिवाय प्रधानमंत्री चेन्नईमध्ये खेलो इंडिया युवा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभात सहभागी होतील. त्यानंतर बेंगळुरूमध्ये बोईंग इंडियाच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्राचं ते उद्घाटन करतील आणि बोईंग सुकन्या योजनेलाही सुरुवात करतील. त्यांच्या हस्ते DD पोधीगई चॅनेलचं सुधारित रुप असलेल्या DD तमिळ चॅनेलचं लोकार्पण होईल आणि देशातल्या प्रक्षेपण क्षेत्राला बळकट करणाऱ्या अडीचशे कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पणही प्रधानमंत्री करतील. .याशिवाय १२ राज्यातल्या २६ नव्या एफएम प्रक्षेपकांचं भूमीपूजनही प्रधानमंत्री करतील. यावेळी ८ राज्यातले १२ एफएम केंद्र, जम्मू-काश्मिरातले दूरदर्शनचे ४ प्रक्षेपक, यांचं लोकार्पण त्यांच्याहस्ते होईल
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत