घरकुल विरोधात सरपंच आणि आमदार…

शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच.
जळगाव.
भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार बेघर लोकांना घरकुल देत आहे.त्यासाठी सर्वच महसूल व ग्रामविकास आधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.यासाठी अंतिम वर्ष होते २०२२.नंतर वाढवले २०२३.आता पुन्हा वाढवले २०२४.
सरकार चे धोरण आहे.जमीन सरकार देते.अनुदान सरकार देते.तर मग,कोण अडवणूक करतो?याचा मी ग्रामीण भागात असे प्रकरण हाताळले तर अनुभवास आले कि, सरपंच हेच घरकुल साठी विरोध करीत आहेत.त्याला स्थानिक आमदार सरपंच सोबत घरकुल देण्यात विरोध करीत आहेत.
धरणगाव तालुक्यातील नांदेड ची २०११ची घरकुल पात्र लाभार्थ्यांची यादी होती.तेथे १८गट गावठाण आहेत.७२हेक्टर जमीन उपलब्ध आहे.पैकी गट नंबर १६३८ ,जळगाव चे कलेक्टर यांनी लेखी स्वरूपात त्या गटात घरकुल देण्यासाठी परवानगी दिली आहे.तरीही तेथील पात्र नागरिक घरकुल वाचुन वंचित आहेत.कारण?तेथील धनदांडगे लोक त्या गटातील जमीन कसत आहेत.काहींनी बळजबरीने अतिक्रमण केले आहे.काही सरपंच, ग्रामसेवक,बीडीओ यांना लगान देत आहेत.
तेथील ग्रामपंचायत सदस्य कर बुडवले कारणे १३ सदस्य कलेक्टर ने अपात्र केलेत.ग्रामसेवक मुरलीधर उशीर आणि ग्रामविस्तार अधिकारी भगवान माडे यांचेकडे संपूर्ण कारभार आला.मी यांचेकडे विनंती करून गट अलोट करण्याची प्रोसेस करून घेतली.बीडीओ अमोल जाधव, तहसीलदार नितिन देवरे आणि उप जिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी ताबडतोब प्रशासकीय मंजुरी मिळवून दिली.तरी पण घोडे अडले कोठे?
याच लोकांचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील.या माणसाने घरकुल साठी मदत तर केलीच नाही,उलट बीडीओ स्नेहा कुडचे आणि गावकऱ्यांना हाताशी धरून नाशिक आयुक्त कडे विरोध नोंदवला.नाशीक आयुक्तांनी दोन वेळा तो विरोध नाकारला.तरीही यांनी घरकुल मिळू दिले नाही.आता पुन्हा हेच गावकरी आणि ग्रामपंचायत यांनी मथ्थी करुन पुन्हा नाशिक आयुक्त कडे विरोध नोंदवला.तीन वर्षे वाया घालवली.आता पुन्हा एक वर्ष वाया जाईल.
मी नांदेड येथे गेलो असता बीडीओ स्नेहा कुडचे यांचे समोर अतिक्रमण गावठाण गट करणाऱ्या लोकांनी माझेवर हल्ला केला.म्हणे ,हाच माणूस या गरीबांना साथ देत आहे.मातवत आहे.आमचे अतिक्रमण काढत आहे.माझे सोबत मिलिटरी चे रिटायर कमांडो ईश्वर मोरे होते म्हणून त्या अतिक्रमण धारकांनी शारिरीक मारामारी केली नाही.
पण मी या निर्णयाप्रत आलो आहे कि, सरपंच आणि आमदार हेच गरीबांना घरकुल देण्यास अडथळा आणत आहेत.गरीब लोक गरीबच राहिले पाहिजे.बेघर लोक बेघरच राहिले पाहिजे.असा त्यांचा हेतू आहे.
धरणगाव चे आमदार गुलाबराव पाटील बाहेर तर खूप फेकतात,नाच गाणे काय करतात, डायलॉग काय मारतात.पण घरकुल देण्यासाठी जबाबदारी पाळत नाहीत.कारण हेच घरकुल पात्र बेघर लोक पैसे,दारु,जेवण घेऊन गुलाबराव पाटील यांना मतदान करतात.त्यासाठी यांना कंगाल,बेघर ठेवण्याचे उदिष्ट आहे.गुलाबराव पाटील यांनी किती घबाड भरले,यांची इडी मार्फत चौकशी झाली पाहिजे.महाजन, फडणवीस,मोदी ,शहा का इडी लावत नाहीत?हे चोरीत लाभार्थी असू शकतात.
असाच अनुभव जामनेर तालुक्यातील शहापूर येथे आला.तेथे गट ३०७ग्रामपंचायतने कायदेशीर पांच लोकांना घरकुल दिले.जागा आणि अनुदान ही.घर बांधले.फोटो काढले.रेकॉर्ड बनवले.
त्या गटातील उरलेली जागा प्रत्येकी २५हजार प्रमाणे सरपंच व ग्रामसेवक ने इतरांना विकून टाकली.पैकी एकाला त्या विक्री तून हिस्सा दिला नाही.तो माणूस औरंगाबाद हायकोर्टात गेला.सर्वच अतिक्रमण सांगून घरकुल पाडण्याचे आदेश मिळवले.घरकुल पाडू नये म्हणून त्या पांच गरीब लोकांना ब्लॅकमेल करून पैसे उकळणे चालू केले.
ही सर्व हकिकत मी जामनेर चे आमदार गिरीश महाजन,जे आता ग्रामविकासमंत्री आहेत, त्यांना सांगितली.कि ,हे घरकुल तोडले तर तुम्ही पुन्हा आमदार म्हणून निवडून येणार नाहीत.हा कलंक तुम्हाला माफ करणार नाही.महाजन यांनी मनावर घेतले.आता हायकोर्टात खरी माहिती दाखल करून घरकुल वाचवण्यात येत आहेत.अजूनही काही बदमाष त्या घरकुल मधील लोकांना धमकावत आहेत.
आज रोजी तेथील ग्रामसेवक विनायक बिजागरे व बीडीओ इंगळे साहेब यांनी मला व घरकुल लाभार्थ्यांना समक्ष भेट देऊन मदत करण्याचे आश्वासन दिले.पण सरपंच, पंचायत समिती सदस्य,झेडपी सदस्य यांनी बेघर लोकांना काडीमात्र मदत केली नाही.
जळगाव झेडपी चे सर्वच सीईओ नालायक,चोर असल्याचा अनुभव आला आहे.हेच बदमाष आम्ही निवडून दिलेले हरामखोर झेडपी चोरांच्या मदतीने जळगाव जिल्हा लुटून नेत आहेत.भ्रष्टाचारात पारंगत झालेले सीईओ पुढे कलेक्टर बनतील.महाचोर बनतील.
मी ग्रामीण भागातील शेतकरी आणि गरीबांसाठी सरकारी सुविधा, अनुदान मिळवून देत असतांना आमदार मदत तर करीतच नाहीतर,उलट अनुदान परस्पर लंपास करण्यात सामील होतात.आम्ही गरजूंना घेऊन आंदोलन करतो, तेंव्हा हेच हरामखोर, नालायक,चोर आमदार पोलिसांना फोन करून आमचेवर गुन्हे दाखल करण्यास सांगतात.अशा आमदारांना आम्ही तोंडावर बोलतो, लोकांसमोर बोलतो.का रे, हरामखोर! यासाठी तुम्हाला निवडून देतो का?
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत