महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

आंबेडकरवाद विरुध्द मार्क्सवाद भाग- 3

जगातील सर्व धर्माचा परिपूर्ण अभ्यास असणारा आंबेडकरवाद की फक्त ख्रिश्चन धर्माचा अभ्यासाच्या आधारे अर्धवट विधान करणारा मार्क्सवाद !!!

धर्माला अफूची गोळी म्हणणारा कार्ल मार्क्स यांनी जगातील धर्माचा परिपूर्ण अभ्यास कधी केलाच नव्हता .त्यांनी फक्त ख्रिश्चन धर्मातील बायबल मधील ‘Sermon on the Mount’ यावर आधारित एका पॅरेग्राफ च्या आधारे धर्म अफूची गोळी म्हणून जाहीर करून टाकले परंतु इतर धर्माच्या अभ्यास करण्याच्या मेहनतीमध्ये तो गेलेला दिसत नाही.. सर्मन ऑन द माउंट मध्ये निर्धन आणि निर्बल व्यक्तीला स्वर्गाची गॅरंटी दिलेली आहे… बौद्ध धर्मामध्ये मात्र ना स्वर्ग आहे ना नर्क . बौद्ध धर्मामध्ये बुद्ध आपला एक शिष्य अनाथपिंडक यास सांगतो शिक्षा आणि पैसा कमवा .. बाबासाहेब तर शिक्षा पैसा संपत्ती राजकीय महत्वाचे पदे सर्व आपल्या लोकांनी ताब्यात घेतले पाहिजे म्हणून सांगतात आणि भौतिक साधन संपत्तीचे महत्त्व विशद करतात . जमिनीचे समान वाटप आणि समान हक्क हे बाबासाहेबांच्याच विचारांची देणगी आहे ..यामुळे सर्मन ऑन द माउंट हे प्रत्येक धर्मास लागू होत नाही आणि प्रत्येक धर्म अफूची गोळी नसतो …. कार्ल मार्क्स चा अभ्यास कधीच परिपूर्ण नव्हता ना त्याने कधी त्याच्या तत्त्वज्ञानाची टेस्टिंग केली… मार्क्सवाद फक्त आणि फक्त अराजकतेस जन्म देऊ शकतो याउलट आंबेडकरवाद लोकशाही संविधानिक मार्ग यावर ठाम असतो…

Prakash Tupe

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!