दीव इथल्या घोघला समुद्र किनाऱ्यावर आजपासून विविध क्रिडा स्पर्धांचं आयोजन….

वीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे बाराशेहून अधिक खेळाडू आठ क्रिडा प्रकारांमध्ये सहभागी होत आहेत. केंद्रशासित प्रदेश दीव इथल्या घोघला समुद्र किनाऱ्यावर आजपासून प्रथमच विविध क्रिडा स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे. केंद्रीय युवा आणि क्रिडा व्यवहार मंत्री अनुराग सिंह ठाकूर या स्पर्धांच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी या स्पर्धांमधील सहभागींना दूरस्थ पद्धतीनं संबोधित करतील.
बिच वॉलिबॉल, पेनकाकसिलात, बिच बॉक्सिंग, बिच सॉकर आणि समुद्रात पोहणे यासह मल्लखांब, बिच कबड्डी आणि रस्सीखेच असे क्रिडा प्रकार यात समाविष्ट आहेत. या स्पर्धांची मध्यवर्ती संकल्पना डॉल्फिन्सवर आधारित आहे. स्पर्धांचा समारोप भारतीय नौदलाच्या खुखरी स्मारकावर होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत