सावित्रीमाईची जयंती…

आज बहुतांशी महिलांना माहित नसेल की ३ तारखेला सावित्रीमाईची जयंती आहे..त्यांना वटसावित्री न चुकता माहित असते…मार्गशीर्ष गुरूवार लक्षात असतात परंतु,
महिलांच्या शिक्षणा साठी जीने शेनाचे गोळे झेलले
वेळ पडली तेव्हा स्वताचे घर सोडले त्या सावित्रीमाईला आज तिची लेक विसरलेली दिसते…. स्वताच्याच विश्वात रममाण झालिये…कर्मकांड उपास तपास आणि टीवी वरील मालिका यांपेक्षा वेगळे जग तिला ठावुक नाही .. कामानिमित्त घराबाहेर पडणार्या महिलांची ही अवस्था….मग गृहिनिंची तर त्याहुन बिकट ..या सावित्रींच्या लेकीसाठी..
सावित्रीची लेक शिकली शाळा,जीच्यासाठी झेलला शेनाचा गोळा.. सनातन्यांच्या खावुन शिव्या
दिशा उघडल्या तिने या नव्या ,कर्मठांच्या हातून सोडवला समाज भोळा सावित्रीची लेक शिकली शाळा..लेक तिची आज शिकू लागली पोथीपुराणे वाचु लागली उपासतापासांना नाही बसला आळा..सावित्रीची लेक शिकली शाळा
वटपुनवेला नटायची संधी ग्रहणकाळात कापायला बंदी,धजवत नाही सोडण्या रुढींचा पिळा..सावित्रीची लेक शिकली शाळा
डॉक्टर झाली घरी विटाळ पाळी,शास्त्रज्ञ झाली तरी रुद्राक्ष गळी,नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा..
सावित्रीची लेक शिकली शाळ वास्तुशास्त्राने बदल घरात गर्भसंस्कार चालतो जोरात
नविन फैशन येईल फ़क्त त्यावर डोळा..सावित्रीची लेक शिकली शाळा नागपंचमी अन संक्रांत वाण
एवढ्या साठीच का बाईचे जीन?शिकलेली महिला बनली अहिल्याशिळा..
सावित्रीची लेक शिकली शाळा हे स्वातंत्र तुझे देणे तीचे आहे,उपकार तीचे फेडायचे आहे,साथ हवी आहे नको कोरडा उन्माळा… सावित्रीची लेक शिकली शाळा जातिभेद अन लिंगभेदाची कीड मारूया विषमतेची
साथ दे फुलवायला समतेचा मळा सावित्रीची लेक शिकली शाळा जीच्यासाठी झेलला शेनाचा गोळा सावित्रीची लेक शिकली शाळा, अश्या थोर मातेस १९३व्या जन्मजयंतीच्या सर्व स्त्रीवर्गास मनापासून शुभेच्छा
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत