क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती दिन ३जानेवारी २०२४

जयवंत हिरे
कोरोनाच्या मरणोत्सवात आता जसे रस्त्यारस्त्यांत टाचा घासत माणसं अन्नान होऊन मेले.मेलेल्यांची प्रेतं नदी-नाल्यात वाहात असतांना,कुत्रे-मांजरं प्रेतांवर ताव मारत असतांना धर्मोन्माद जागवायला आता जसे टाळ्या वाजवायल्या-दिवे लावायला सांगितलं गेलं.
तसचं प्लेगच्या साथीने टाचा घासत मारणाय्रांना वाचवायसाठी रँड साहेब उपचारांची शिकस्त करीत झूंजत होता साय्रा सरकारी यंत्रणेसह, त्यावेळी त्यांनी छात्या पीटत आक्रोश करायला केली सुरवात;” हा हिंदूंना धर्म भ्रष्ट करायचा गोरा कट.” आणि घेतला बळी धर्म रक्षणासाठी माणसं वाचवणाय्रा रँड साहेबांचा.
त्या वेळी तु मरण मानगुटीवर घेवून मारणाय्रांना वाचवायसाठी झूंज घेत फिरु लागलीस पायाला भिंगरी बांधून वणवण.आपल्या डॉक्टर यशवंतालाही बोलावून घेतलंस सैन्यातुन माणसं मरणाच्या दाढेतून ओढायला.
पटापटा मरणारी माणसं मरणाच्या दाढेतून ओढता ओढता अखेर तुच कधी मरणाच्या कराल दाढेत अडकलीस तुझं तुलाही कळलंच नाही.
पण,मरूनही तू मृत्युवर विजय मिळवत अजरामर झालीस.
देव-धर्म रक्षणासाठी माणसं मारायच्या आजच्या काळात तुझं माणसं जगविण्यासाठी स्वत:ला मरणाच्या कडेलोटावर ढकलणे किती लखाखुण दिसतंय.
ए माय सावित्री;तुला क्रांतिकारी अभिवादन!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत