बोरवणकरायचा बोलविता धनी कोण ? पुरावे द्या अन्यथा कोर्टात जाणार अजित पवार गटाच्या रूपाली चाकणकर यांचा इशारा !

मीरा बोरवणकरांचा बोलवता धनी कोण? असा सवाल अजित पवार गटाच्या रूपाली चाकणकर यांनी सवाल उपस्थित केला आहे. तर पुरावे द्या, अन्यथा न्यायलयात जाणार असा इशारा देखील रूपाली चाकणकर यांनी माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांना दिला आहे. यावर बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, असे अनेक आरोप बरेच जण करतात मात्र पुरावे कोणाकडे नसतात. त्यामुळे मीरा बोरवणकर यांनी जे काही आरोप अजित पवार यांच्यावर केले आहेत. त्याचे पुरावे त्यांनी सादर करावे. आपल्याकडे पुरावे असेल तर बोलावं. गेल्या १२ वर्षांपूर्वीची गोष्ट ते आज बोलताय, त्यामुळे यामागे त्यांचा बोलवता धनी कोण? आहे हे पाहावं लागेल असं रूपाली चाकणकर म्हणाल्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत