माझे मत: सुजाता सैनिक या महिला IAS अधिकारी यांना मुख्यसचिव पदी नेमावे.

इ झेड खोब्रागडे, भाप्रसे नि
संविधान फौंडेशन, नागपूर.
दि 4 JAN 2024.
रश्मी शुक्ला IPS यांना महाराष्ट्र सरकारने पोलीस महासंचालक पदी नियुक्ती केली. महिलेला सन्मान मिळाला , अभिनंदनीय आहे.
मात्र, महाराष्ट्र सरकारच्या पुरोगामीत्वाला अशोभनीय एक गोष्ट झाली ती ही की सुजाता सौनिक IAS ह्या महिला अधिकारी जेष्ठतम असूनही त्यांना मुख्यसचिव या पदावर नियुक्तीमध्ये दोनदा डावलले आहे. मनोज सौनिक ऐवजी सुजाता सौनिक यांना ,जेष्ठतेनुसार मुख्यसचिव पदी नेमायला पाहिजे होते. जाणीवपूर्वक चूक करून अन्याय केला. पुन्हा केला. यानंतर तरी चूक सुधारावी आणि सुजाता सौनिक यांना संधी द्यावी. अनेक राज्यात ,महिला IAS अधिकारी मुख्यसचिव आहेत. महाराष्ट्रात का नाही? अजून तरी जेष्ठता असूनही महिलेला संधी मिळाली नाही.
काहींना जातीचा फायदा तर काहींना नुकसान होऊ नये. मुख्यसचिव होणे IAS अधिकाऱ्यांचे स्वप्न असते. सरकारने भेदभाव करून स्वप्नाचा चुराडा करू नये. सुजाता सौनिक IAS ह्या 1987 च्या , सर्वात जेष्ठ, अनुभवी, कार्यक्षम व धडाडीच्या अधिकारी आहेत. संधी देऊन सामाजिक न्याय करून सरकारने आपले संविधानिक कर्तव्य पार पाडावे.
राज्यात महिला मुख्यसचिव व महिला पोलीस महासंचालक होणे भूषणावह ठरते. पुरोगामीत्वाला शोभणारे ठरते आणि तशी संधी आपोआप उपलब्ध झाली आहे. महिला IPS अधिकारी महासंचालक झाल्यात. महिला IAS अधिकारी कधी मुख्यसचिव होतील? विद्यमान मुखसचिव यांचे निवृत्तीनंतर तरी सुजाता सौनिक यांना सरकारने मुख्यसचिव पदी नेमावे.मान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्षात घ्यावे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत