महाराष्ट्र

ऑक्टोबर हिटनंतर राज्यात थंडीची लाट, IMD कडून महत्वाचे अपडेट

ऑक्टोबर हिटमुळे राज्यातील अनेक शहरांचे तापमान वाढले होते. सर्वच जण घामाघूम होत होते. कडक्याच्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत होती. नवरात्र उत्सवात दांडिया, गरबामध्ये रंगलेल्या तरुण, तरुणींना ऑक्टोबर हिटचा चांगलाच परिणाम जाणवत होता. परंतु आता गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्यातून दिलासा मिळू लागला आहे. राज्यातील अनेक शहरांचे तापमान कमी होऊ लागले आहे. राज्यातील सर्वात हॉट शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावचे तापमान नीच्चांकावर आले आहे. राज्यात सर्वात कमी तापमान जळगावचे नोंदवण्यात आले. तापमानसंदर्भात आयएमडीने महत्वाची माहिती दिली आहे.

काय दिले आयएमडीने अपडेट

ऑक्टोबर हिटपासून राज्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील तापमान कमी होऊ लागले आहे. आता येत्या दोन दिवसांत पुणे गारठणार असल्याची माहिती हवामान विभागातर्फे देण्यात आली. ऑक्टोबर हिटनंतर आता पुणे शहरात काही दिवस थंडीची लाट येणार आहे. तसेच दोन दिवस तापमानात घसरण होणार आहे. हवामानातील या बदलामुळे शहरात यापूर्वी अनुभवलेल्या ऑक्टोबर हिटचा प्रभाव कमी होणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागाकडून देण्यात आली.

राज्यात सर्वात कमी तापमान जळगावात

राज्यात सर्वात कमी तापमान जळगावात नोंदवले गेले. जळगाव शहर हॉट सीटी म्हणून ओळखले जाते. उन्हाळ्यात अनेक वेळा या शहराचे तापमान राज्यात सर्वाधिक असते. परंतु ऑक्टोबर हीटपासून जळगावकरांना दिलासा मिळाला आहे. जळगाव शहराचे तापमान १३.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. जळगावपेक्षा महाबळेश्वरचे तापमान अधिक होते. महाबळेश्वरचे तापमान १६. ८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. राज्यात इतर ठिकाणी तापमान सरासरीच्या जवळपास होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!