गोरगरिब मराठ्यांचं रक्त पिऊन तुम्ही पैसा कमावला.

सभेला ७ कोटींचा निधी कुठून आला? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला. त्यावर जरांगे पाटील म्हणाले की , मला त्यांना सांगायचंय, माझ्या माय बापाने कापूस विकून १००-५०० जमा केले आणि सभेचा खर्च केला. १०० एकर मैदान आम्ही भाड्याने घेतलंय, विकत घेतलं नाही. लोक तुम्हाला पैसे देत नसतील पण आम्हाला देतात. ज्या गोरगरिब मराठ्याने तुम्हाला मोठं केलं त्यांचंच रक्त पिऊन तुम्ही पैसा कमावला म्हणून तुमच्यावर धाड पडली आणि तुम्ही जेलमध्ये गेलात, अशी बोचरी टीका मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर केली. यावेळी त्यांनी भुजबळ यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीकेचे आसूड ओढले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत