
नवी दिल्लीतल्या इस्रायली दूतावासाजवळ काल संध्याकाळी एक स्फोट झाला. घटनास्थळी शोधमोहिम सुरू आहे. स्फोट दूतावासाजवळच्या भागात झाला. सर्व राजनैतिक अधिकारी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती दूतावासाचे उप-प्रमुख ओहाद नकाश कायनर यांनी दिली. दूतावासाचं सुरक्षा पथक अधिकाऱ्यांना तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचंही त्यांनी सांगितले. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाच्या पथकानं घटनास्थळी पोहोचून शोधमोहिम सुरू केली आहे. आतापर्यंत कोणतंही स्फोटक मिळालेलं नाही.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत