महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

संतश्रेष्ठ तुकोबाराया..

– नंदू वानखडे/ मुंगळा 9423650468

सत्य सांगून, गेला तुका
तुम्ही त्यातून, काहीतरी शिका
देव सांगून, नका लावू थुका..

खरी तुकाने, केली भक्ती
नाही गवसली,कोणतीच शक्ती
नाही मिळाली,कोणतीच मुक्ती..

ठेवा मनावर,आपला ताबा
नको पूजाया, साधू बाबा
तूका विचाराचा,हाच गाभा..

ध्यानी धरावा, तुकोबाराया
नको भलत्याच्या,लागावे पाया
त्याने बिघडल्या,कित्येक बाया..

तुकोबाचा,हाचि संदेश
ना बिघडावा,आपला देश
टाका पुसून,संभ्रमी रेष….!

मानवी मनाचं,कल्याण व्हाया
सांगे अभंग,तुकोबाराया
अशी तुकोबाची, ही माया..!

खरा विद्रोह ,केला तुकाने
जीवे मारीले, त्याला लोकाने
मनी रुजविले, वैकुंठी जाणे…!

आताही कीर्तने, कितीक छानं
जर का न्यायला, येई विमानं
किती वाढेल, त्यांची बी शानं…!

— प्रा. नंदू वानखडे
मुंगळा जि. वाशिम ९४२३६५०४६८

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!