मुख्य पान

मा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व्हेक्षणा नुसार भोगवटदार म्हणून नोंदी घेणार

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांची मध्यस्ती खासदार आमदार यांच्याशी दुरध्वनी द्वारे चर्चा नंतर उपोषण मागे

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग शहरातील शासकीय जागेवर राहणाऱ्या कुटूंबियाच्या घर जागेची नगरपरिषद दप्तरी नोंद करुन घ्यावी त्या ठीकाणी प्रधानमंञी आवास योजना, रमाई आवास योजनेचा लाभ मिळावे या करिता नगरपरिषद कार्यालयसमोर वसंतनगर, दुर्गानगर, इंदिरानगर, बौध्दनगर, भिमनगर, डॉ आंबेडकर नगर येथील नागरिकांनी आमरण उपोषण सुरु केले होते परंतू लाभार्थांना स्वतःच्या नावे जागा नसल्याने रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी विलंब होत होता अनेक वर्ष झाली शासकीय जागेवर पत्र्याचे छप्पर व दगड मातीचे घर करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत . येवढा पाठ पुरावा करून पण नगर परिषद या अतिक्रमण धारकांची दखल घेतली नाही म्हणून १६ नोहेंबर २०२३ पासून
नळदुर्ग येथे नगर परिषदे समोर अमरण उपोषण सुरु करण्यात आले हे अमरण उपोषण कल्पनाताई गायकवाड पत्रकार दादासाहेब बनसोडे माजी नगरसेविका क्षमाताई राठोड यांच्या नेतृत्वाखाली १०० ते २०० नागरीकासह हे उपोषण करण्यात आले एकुण १८ लाभार्थी अमरण उपोषणास बसले तर काहीनी माघार घेतली काही दिवसा नंतर उपोषणकर्ते दादासाहेब बनसोडे , कल्पना सखाराम गायकवाड सुनिल राठोड , रवि राठोड यांची प्रकृती खालावली त्यांनाही उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले .
गेल्या पन्नास वर्षांपासून शासकिय जागेवर कब्जे वहिवटीनुसार राहणाऱ्या कुटूंबाच्या घरजागेची नगरपरिषद कार्यालयात नोंद यांची पुर्ण दक्षता नगर परिषद घेणार शिवाय सर्व्हे नंबर २९ / व 236/1/ 3 मधील नागरीकांचे सर्व्हेक्षण झाले आसल्याचे पत्रकात म्हटले आहे . मा जिल्हाधिकारी यांच्या आदेशा नुसार सर्व्हेक्षण करण्यात आले आहे त्या नुसार भोगवटदार म्हणून नोंद करून घेऊन ८ अ चा दाखला देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे .
नगर परिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार व कार्यालयीन अधिक्षक दिपक कांबळे यांचे लेखी अश्वासन आणी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांची मध्यस्ती आणी उपोषण कर्ती कल्पना गायकवाड यांनी .धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर , लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील , आमदार कैलास पाटील आमदार ज्ञानराज चौगुले व इतर कार्यकर्ते वकील यांच्याशी दुरध्वनी द्वारे चर्चा केली इतरांचे मार्गदर्शन सहकार्यामुळे उपोषण कर्त्याना दिलासा मिळाल्याने त्यांच्या कडुन समाधान कारक माहिती मिळाली त्यामुळे वसंतनगर दुर्गानगर इंदिरानगर भिमनगर बुद्धनगर डॉ आंबेडकर नगर मधील शासकीय जागेवर राहात आसलेल्या लाभार्थांचा प्रश्न मार्गी लागल्याने चौथ्या दिवशी हे अमरण उपोषण मागे घेण्यात आले . यावेळी शिवसेनेचे कमलाकर काका चव्हाण भाजपाचे सुशांत भुमकर , पद्माकर घोडके काँग्रेसचे पांडू पुदाले शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके भाजपाचे संजय बताले अदिजन उपस्थित होते . शिवाय लाभार्थी शेकडो च्या संख्येने उपस्थित होते .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!