देशात कोरोनाच्या जेएन-1 प्रकारच्या रुग्णांमध्ये वाढ

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोविडच्या ५२९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सध्या ४ हजार ९७ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात कोरोनाच्या जेएन-1 प्रकारच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, एका दिवसात जेएन-1 व्हेरियंटचे १०० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सनं आपत्कालीन विभागात तपासणी बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, गंभीररीत्या आजारी रुग्णांसाठी १२जागा राखून ठेवल्या जाणार आहेत. दरम्यान राज्यात काल ८७ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत १९ नवे रुग्ण आढळले असून, पुणे शहर आणि सांगलीत प्रत्येकी एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातल्या कोविडच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २६५ इतकी असून, जेएन-वन या प्रकारचा संसर्ग झालेल्यांची संख्या १० झाली आहे. तसंच केरळ, कर्नाटक, गुजरातसह दिल्लीमध्येही नव्या जेएन-वन प्रकारचे रुग्ण आढळले आहेत. राज्यात ८७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून या विषाणूच्या संसर्गामुळे २ जण दगावले आहेत. सध्या राज्यातल्या कोविडच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २६५ इतकी असून, विषाणूच्या जे एन १ या प्रकारचा संसर्ग झालेल्यांची संख्या १० झाली आहे. तसंच केरळ, कर्नाटक, गुजरातसह दिल्लीमध्ये नव्या जेएन-1 प्रकारचे रुग्ण आढळले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत १९ नवे रुग्ण आढळले असून, पुणे शहर आणि सांगलीत प्रत्येकी एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत