राजकीय

 मराठा आरक्षणाबाबतची आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना

मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कालच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले. त्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आपण मराठा समाजाला आरक्षण देणार, असं आश्वासन दिलं. पण त्यानंतरही मराठा नेते मनोज जरांगे पाटील आजपासून उपोषणाला बसले आहेत. मराठा समाज आता आरक्षणासाठी आक्रमक होताना दिसत आहे. मनोज जरांगे उपोषण मागे घेण्यास तयार नाहीत. त्यांना आज सकाळी मंत्री गिरीश महाजन यांनी फोन करुन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव वाढला आहे.

विशेष म्हणजे याच दबावातून वरिष्ठ पातळीवरील हालचालींना प्रचंड वेग आलाय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. मराठा आरक्षणाबाबतच्या घडामोडींमधील ही आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री थेट दिल्लीच्या दौऱ्यावर गेल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीत मराठा आरक्षणावर खलबतं होणार

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत हे दोन्ही मोठे नेते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत. मराठा आरक्षण लागू करण्यासाठी काय-काय करता येईल, याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!