आरोग्यविषयकदेशभारतमुख्य पानमुख्यपानसंपादकीय

दिल्लीच्या सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांकाची गंभीर श्रेणीत नोंद…

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील हवेचा दर्जा निर्देशांक काल ४५०हून अधिक नोंदवला गेला. या भागातील हवेची गुणवत्ता आणखी खालावण्यापासून रोखण्यासाठी वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं प्रतिसाद कृती योजनेचा तिसरा टप्पा पुन्हा सुरू केला होता.राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रात प्रतिसाद कृती योजनेचा तिसरा टप्पा लागू करूनही, दिल्लीतील सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक काल गंभीर श्रेणीत नोंदवला गेला. दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेत अचानक घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. या तिसऱ्या टप्प्या अंतर्गत, दिल्ली आणि एनसीआरमध्ये बांधकाम तयार करण्याच्या आणि बांधकाम पाडण्याच्या कामकाजांवर बंदी घालण्यात आली. तसंच योगाच्या निर्देशांनंतर, दिल्ली सरकारनं दिल्लीत भारत टप्पा तीन-पेट्रोल आणि भारत टप्पा-चार डिझेल चारचाकी वाहनांवरही कडक निर्बंध लादले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!