दिल्लीत हवेच्या प्रदूषणामुळे ४चाकी वाहनांवर बंदी…

दिल्ली सरकारनं हे आदेश काल जारी केले. दिल्लीत चारचाकी वाहनांवर बंदी घालण्यात आली. दिल्ली आणि परिसरात हवेचा दर्जा आणखी खालावल्यामळे तिसऱ्या टप्प्यातील उपाययोजना काल जारी करण्यात आल्या. हवेच्या दर्जाबाबत व्यवस्थापन करणाऱ्या आयोगाच्या उपसमितीनं आठ कलमी कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. दिल्ली आणि एनसीआरमध्ये बांधकाम आणि पाडकामविषयक कामांवरही बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार,रस्त्यांची साफसफाई यांत्रिक पद्धतीनं करण्याची नियमितता वाढवण्यास सांगण्यात आलं आहे.रस्त्यावर जमा झालेली धूळ खाली बसण्यासाठी विशिष्ट घटकांबरोबर पाण्याचं सिंचन रोज करायलाही सांगण्यात आलं. सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर वाढण्यासाठी गर्दी नसलेल्या वेळेसाठी सवलतीचे तिकीट दर लागू करण्याचीही सूचना करण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत