इमारत कोसळून डोंबिवली मधे एकाचा मृत्यू तर एका महिलेला ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढले.

शुक्रवारी सायंकाळी डोंबिवली येथील पूर्व भागातील आयरे गावात अधिनारायण तीन माळ्याची धोकादायक इमारत कोसळून एकाचा मृत्यू झाला. ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी एका महिलेला ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढले आहे. आणखी एकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. ५० वर्षापूर्वी लोड बेअरिंग पध्दतीने बांधलेल्या अधिनारायण इमारतीत एकूण ४० कुटुंब राहत होती.
ही इमारत अतिधोकादायक असल्याने पालिकेच्या ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त सोनम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी या इमारतीमधील रहिवाशांना सदनिका खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. काही कुटुंब या इमारतीमधील घरे सोडून यापूर्वीच अन्यत्र राहण्यास गेली आहेत. काही कुटुंबांना शुक्रवारी सकाळी घराबाहेर काढण्यात आले. तर या इमारतीमध्ये अरविंद संभाजी भाटकर (७०) हे एकटेच राहतात. ते बिछान्याला खिळून आहेत. सुनील बिरझा लोढाया (५५) आणि दीप्ती सुनील लोढाया (५४) हे दाम्पत्य सुद्धा इमारतीत राहत होते. दीप्ती या मानसिक दृष्टया आजारी आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत