
केंद्र आणि राज्य सरकारांमधील सहभागात्मक प्रशासन आणि भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्य सचिवांची राष्ट्रीय परिषद आयोजित केली जात असते. अशा प्रकारची ही तिसरी परिषद आहे. देशातल्या सर्व मुख्य सचिवांच्या तीन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचा आज समारोप होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल या परीषदेचं अध्यक्षपद भूषवलं. या परिषदेत, केंद्र आणि राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांमधील सुलभता, सेवा आणि वितरणातील गुणवत्ता यावर भर देण्यात येणार. या शिवाय, सायबर सुरक्षा, प्रशासनातील कृत्रिम बुद्धिमत्तेवरील उदयोन्मुख आव्हानं या विषयांवर विशेष सत्रं आयोजित करण्यात आली आहेत. या परिषदेत केंद्र आणि राज्य सरकारांतील २०० + सचिव आणि अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत