आजपासून दिवसा अवजड वाहनांना बंदी ; मुंब्रा बाह्यवळण, शिळ फाटा मार्गावर

शिळ फाटा, कल्याण फाटा भागात विकास प्रकल्पांची कामे आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी मुंब्रा बाह्यवळण मार्ग, कल्याण फाटा, शिळ फाटा मार्गावर दिवसा अवजड वाहनांना बंदी लागू केली आहे. ही वाहतूक ठाणे-बेलापूर मार्ग, पूर्व द्रुतगती या पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गांवर अवजड वाहनांचा भार वाढून कोंडीची शक्यता वर्तविली जात आहे. हे बदल शनिवारपासून पुढील दोन महिने लागू असतील. रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अवजड वाहनांना मुंब्रा बाह्यवळण, शिळ फाटा येथे वाहतुकीस मुभा असेल.
ठाणे शहरात अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे पाच या वेळेत परवानगी आहे. त्यामुळे उरण जेएनपीटी बंदरातून सुटणारी हजारो अवजड वाहने शिळ फाटा, मुंब्रा बाह्यवळण मार्गे गुजरात, नाशिक आणि भिवंडीच्या दिशेने वाहतूक करत असतात. याच मार्गावरून हजारो नोकरदार नवी मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून शिळ फाटा भागात उड्डाणपुलाच्या निर्माणाचे काम सुरू आहे. त्यामुळे दररोज वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागत असतो.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत