महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या ‘उणिवांची  गोष्ट” एकांकीका महाअंतिमफेरीत

‘लोकसत्ता लोकांकिका’ ठाणे विभागीय अंतिम फेरीत ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या ‘उणिवांची गोष्ट’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत महाअंतिम फेरीत प्रवेश केला. ठाणे शहरासह इतर विविध शहरातून रसिक या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या रसिक प्रेक्षकांसमोर कला सादर करण्याची संधी स्पर्धकांना मिळाली. माजी महापौर नरेश म्हस्के, दिग्दर्शक विजु माने, अभिनेते कुशल बद्रिके, सुनील देवळेकर, ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, निर्माता मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे, रवींद्र गायकवाड, रमेश परदेसी, रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी कार्यकारणी सदस्य सुजय पतकी आदी यावेळी उपस्थित होते.

‘लोकसत्ता लोकांकिके’ची ठाणे विभागीय अंतिम फेरी शुक्रवारी संध्याकाळी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मोठ्या उत्साहात पार पडली. तरुण रंगकर्मींच्या सादरीकरणाला ठाणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मनापासून दाद दिली. कलाकारांनी ‘लोकसत्ता लोकांकिके’च्या मंचावरून कलेचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला.

जोशी- बेडेकर, ज्ञानसाधना आणि एनकेटी, वसई येथील अण्णा साहेब वर्तक आणि पनवेल येथील सी. के. ठाकूर या पाच महाविद्यालयांनी स्पर्धेमध्ये स्थान पटकावले होते.

ठाण्यातील एनकेटी महाविद्यालयच्या ह्यअक्का स्पेशलह्ण या एकांकिकेने स्पर्धेची सुरुवात झाली. अंध आणि मुक दाम्पत्याच्या संसारातील उणिवा आणि त्यांची एकमेकांना समजून घेण्याची धडपड ‘उणिवांची गोष्ट’ या एकांकिकेच्या माध्यमातून ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाने दाखवून दिले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!