आज पुण्यामधील नाना पेठेमध्ये ठाकरेगटाचामेळावा, खासदार संजय राऊत यांची उपस्थिती

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा जाहीर मेळावा शनिवारी होणार आहे. खासदार संजय राऊत या मेळाव्यात मार्गदर्शन करणार असून राज्यातील महायुती सरकारच्या कारभारावर राऊत काय भाष्य करणार, याकडे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
नाना पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या महात्मा फुले मैदानावर सायंकाळी पाच वाजता हा मेळावा होणार आहे. ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर यांच्यासह उपनेते, शहर पदाधिकारी या वेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती शहरप्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांनी दिली. राज्यातील सत्ता समीकरणे बदलली असून विरोधकांकडून महायुतीला अनेक मुद्द्यांवर लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर खासदार राऊत मेळाव्यात महायुतीवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत