वाढते अत्याचार ….!

जानेवारी 2005 ते डिसेंबर 2005 या कालावधीत राज्यात दलितांवर 26177 अत्याचार झाल्याचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. वर्षभरात राज्यात 196 दलितांची अमानुषपणे हत्या करण्यात आली असून 1929 दलित स्त्रियांवर बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. दलित अत्याचार प्रतिबंध कायद्याखाली तब्बल दोन लाख खटले देशात आणि 12000 खटले महाराष्ट्रात कोनाड्यात पडून आहेत. नॅशनल कमिशन फोर शेड्युल ट्राईब्ज यांच्या 2002 सालातील अहवालानुसार या खटल्यात गुन्हा शाबित होऊन शिक्षा होण्याचे प्रमाण फक्त दोन टक्के आहे.
दलितांवर अत्याचार करणारे 98% आरोपी निर्दोष, सही सलामत सुटत असतात. प्रत्येक दिवसाला देशात किमान 50 अत्याचाराच्या घटना रजिस्टर होतात. तीनशे पेक्षा जास्त दलित महिलांवर बलात्कार होतो, सहा जणांना पंगू बनवले जाते. राज्यात दरवर्षी या कायद्याखाली दाखल होणारे प्रकरणाची संख्या अडीच हजार पर्यंत आहे.
साठी ओलांडलेल्या या देशाच्या तथाकथित स्वतंत्र्यात एका सर्वेक्षणानुसार रोज दलितांवरील अत्याचाराची पाचशे प्रकरण होतात. त्यातील दहा टक्के पोलिसांपर्यंत येतात. त्यात तीस टक्के पेक्षा जास्त दलित महिलांवरील बलात्काराची असतात. 50 प्रकरणे दलितांच्या अमानुष हत्येची असतात. साठ प्रकरणे विकलांग होत पर्यंत मारण्याची असतात. म्हणजेच या देशात प्रत्येक 50 व्या मिनिटाला एका दलित महिलेवर बलात्कार होतो. प्रत्येक तिसाव्या मिनिटाला एका दलितांच्या हत्या होते आणि प्रत्येक 24 व्या मिनिटाला एक दलित विकलांग होईपर्यंत उच्च जातीयंतर्फे मारल्या जातो. या देशातील जातीय आतंकवादी अनेकदा दलितांना मारताना त्यांची नग्नदिंड काढतात. त्याला मानवी विस्टा खायला लावतात. गुप्तांग ठेचतात. जखमा करून त्यावर मीठ मिरची पावडर घालतात. दलित स्त्री असेल तर तिची नग्न दिंड काढण्यात येते .सामूहिक बलात्कार करण्यात येतो. गुप्तांगात मिरची पावडर टाकण्यात येते. तर कधी लाकडी लोखंडी दांडा घालण्यात येतो. व असे हाल हाल करून हत्या करण्यात येते.
किती भय्या वय आहे मृत्यू या देशात !
किती अमानुष आहेत जातीय आतंगवादी, आणि त्यांचा सदाचार !!
ऑल इंडिया पँथर सेना
मुंबई प्रदेश सरचिटणीस
पत्रकार सागर कांबळे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत