“सुषमा अंधारेंनी शिवसेना शिंदे गटावर तसेच देवेंद्र फडणवीसांवर केली कडाडून टिका.”

“लोक उगाच म्हणतात देवेंद्र फडणवीस चाणक्य आहेत. मात्र ही सगळी अंधश्रद्धा आहे. चाणक्य माणसं घडवणारा आहे. आपण देवेंद्र फडणवीसांना विचारलं की तुम्ही कुणाला घडवलं तर उत्तर मिळतं कुणालाच नाही. देवेंद्र फडणवीस यांनी माणसं घडवली नाहीत. त्यांनी इकडून तिकडून सगळी भाड्याची माणसं गोळा केली आहेत. “
भाजपाचे अनुसूचित जमाती मोर्चा ठाणे जिल्हाध्यक्ष महादेव घाटाळ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्या नंतर रविवारी संध्याकाळी भिवंडी ग्रामीण मध्ये उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. त्यावेळी सुषमा अंधारे यांनी भाजपा सह शिवसेना शिंदे गटावर सडकून टीका केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत