सदनिकाधारकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने शुल्क अर्धे कमी करण्याचा निर्णय

सदनिकाधारकांना आता ५० हजारांत हे घर हस्तांतरित करता येणार आहे. झोपडपट्टी पुनवर्सन प्रकल्पातील झोपडपट्टीधारकांना हा दिलासा आहे. झोपडपट्टी पुनवर्सन प्रकल्पातील घरे ही गरीब झोपडपट्टी धारकांना विनामूल्य दिली जातात. या घरांचे हस्तांतरण करताना मुद्रांक शुल्काबरोबर एक लाख रुपये हस्तांतरण शुल्क आकारले जात होते.
हे शुल्क कमी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या घोषणेची अंमलबजावणी करताना हे शुल्क ५० हजार रुपये केले आहे. या निर्णयाचा मुंबई, ठाणे परिसरांतील सदनिकाधारकांना लाभ होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत