महाबळेश्वरवाडीत ‘घुंगरू’ चित्रपटाच्या पोस्टरचे प्रकाशन

१५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार,रसिकांना उत्कंठा शिगेला… वरकुटे-मलवडी : वार्ताहर…. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील सगळे स्टेज शो हाऊसफुल्ल करून तमाम रसिकांच्या मनावर आपल्या कलाविष्काराने आणि दमदार नृत्याने अधिराज्य गाजवणारी सबसे कातील गौतमी पाटील हिच्यासह निर्माता दिग्दर्शक बाबा गायकवाड,श्रीमंत ढाकणे,डॉ.अजीत केंद्रे यांचा मराठी चित्रपट सृष्टीतील प्रवास,तमाम लोककलावंतांच्या आयुष्यावर भाष्य करणाऱ्या ‘घुंगरू’ एक संघर्ष या चित्रपटाच्या पोस्टरचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत महाबळेश्वरवाडी ता.माण या ठिकाणी उत्साहात पार पडला. महाबळेश्वरवाडी ता.माण येथील सरपंच इंदुबाई जेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोपटशेट जेडगे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अभिनेता दत्तराज तोरणे,युट्यूब कलाकार मोहन केंगार,विनोद जेडगे,पप्पूशेट पुकळे,महादेव पुकळे,राहूल खरात,संजय जेडगे,भारत पुकळे,सुरेश जेडगे,अंकुश निंबाळकर,बाळू जेडगे,बापुसाहेब जेडगे,सचिन जेडगे,राहूल पुकळे,प्रविण केंगार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.मानवाच्या जीवनाला आनंद देणार्या आणि मनाची करमणूक करणारी हावभाव,अभिनय,नृत्य आदी हालचालींना कला म्हणतात.हिच कला कलाकाराला स्वप्नांच्या दुनियेत भटकायला भाग पाडते आणि त्यासाठी प्रेरितही करते.कलाकार हा नेहमीच नावीन्याच्या शोधात भटकतो,यासाठी त्यास कला उत्तेजित करते.आशा सर्व प्रकारच्या कलावंतांच्या आयुष्यावर आधारीत असलेला ‘घुंगरू’ एक संघर्ष हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र १५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून,या चित्रपटाचे चित्रीकरण थायलंड,जम्मू काश्मीर,वागा बॉर्डर,राजस्थान, पंजाब,अमृतसर,नैनीताल,दिल्ली,मुंबई,पुणे,म्हैसूर,उटी,हंपी, परळी वैजनाथ,बारामती,सोलापूर,माढा,मोडलिंब या ठिकाणी पूर्ण झाले आहे.हा मराठी इंडस्ट्रीतील पहिला चित्रपट असा आहे की,सात राज्यांमध्ये शुटिंग झाले असून,यामध्ये कलाकारांच्या व्यथा लोकांना दिसणार आहेत.आजपर्यंत प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांपेक्षा वेगळेपण दाखवणारा असल्याची माहिती बाबा गायकवाड यांनी दिली.या चित्रपटासाठी चिंतामणी सिनेक्रीएशन, क्रिएटिव्ह दिग्दर्शक प्रशांत तोतला सोमनाथ खिलारे, पटकथा उषा चव्हाण यांची असून,नामवंत गायकांनी गायलेली सुमधुर गाणी यामध्ये समाविष्ट केलेली आहेत.तरकार्यकारी निर्माता सुदाम केंद्रे,निर्मिती प्रमुख वैभव गोरे, यांच्यासह अनेकांनी योगदान दिले आहे.फोटो : घुंगरू चित्रपटाच्या पोस्टरचे प्रकाशन करताना मान्यवर…
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत