महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

अजित पवार आणि छगन भुजबळ यांंच्या भूमिकेबद्दल काय म्हणाले बच्चू कडू ?

अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर बच्चू कडू यांनी सूचक विधान केलं आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, अशी भूमिका भुजबळांनी घेतली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते व अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. या भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात वादाला सुरुवात झाली आहे. यावर आता प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी विधान केलं आहे. अजित पवार आणि छगन भुजबळ यांची भूमिका एकच आहे. वरिष्ठांच्या सहमतीशिवाय भुजबळ अशाप्रकारे आक्रमक बोलत नाहीत, हे स्पष्ट आहे, अशा आशयाचं सूचक विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.अजित पवारांनी छगन भुजबळांना शांत करावं, अन्यथा मी शांत बसणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!