
पंतप्रधानांच्या या दौऱ्याबाबत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री नारायण राणे यांनी भाष्य केलं आहे. ते सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
नारायण राणे म्हणाले, पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचं वेळापत्रक अद्याप तयार झालेलं नाही. राज्य सरकार आणि नौदल मिळून या कार्यक्रमाचं नियोजन करणार आहेत. नियोजन झाल्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना देऊ.
दरवर्षी ४ डिसेंबर हा दिवस नौसेना दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाचा नौसेना दिन महाराष्ट्रासाठी आणि शिवप्रेमींसाठी खास असणार आहे. कारण यंदाचा नौसेना दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ४ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. अशा प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी पंतप्रधान पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत