चित्रपटमहाराष्ट्रमुख्यपान

लवकरच रिलीज होणार “द ओरीजीन”

The Origin नावाचा हॊलिवुडी चित्रपट आठ डिसेंबर रोजी अमेरिकेतल्या निवडक चित्रगृहात प्रदर्शित होणार आहे. नंतर तो १९ जानेवारीला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. 

The Origin of Our Discontents: Exploring ‘Caste’ as the Root of Discrimination या पुस्तकाच्या लेखिकेचा संघर्षपट आहे.

या चित्रपटातून  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जातीविरूद्ध संघर्ष दिसणार आहे.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा हॉलिवूडच्या पडद्यावर दिसणार आहेत.  त्यामुळे भारतात सुद्धा त्याबद्दल उत्सुकता आहे.  एव्हढ्या मोठ्या स्केल वरच्या चित्रपटात बाबासाहेबांवरच्या लढ्याची दखल  घेतली जात आहे.    अद्याप मीडीयात  एखाद दुसरा लेख वगळता सामसूम आहे.

मांजरेकर सावकरकरांवर चित्रपट बनवणार अशी नुसती फुसकुली सोडली तर त्यावर बातम्या येऊ लागल्या. मागे सुधीर फडके सावरकरांवर चित्रपट बनवणार होते. वीस पंचवीस वर्षे ते निधी जमवत होते.  पण तोपर्यंत बाबूजी बाबूजी म्हणून सातत्याने या चित्रपटाबद्दल सकारात्मक लिखाण केले गेले.   काही काही लेखात तर सुधीर फडके तपस्वी असून त्यांच्या या कार्यात प्रत्येक मराठी माणसाने योगदान दिले पाहिजे असा सूर असायचा.  त्या काळात कॉंग्रेस पक्षही सावरकरांचे गोडवेच गात असे.  आजच्या सारखा सावरकरांवर तुटून पडत नव्हता.

अ‍ॅटनबरोने गांधी चित्रपट बनवला तेव्हां गांधीजी आंतरराष्ट्रीय झाल्याचा साक्षात्कार मीडीयाला झाला. भरभरून लिहून येत होतं. शूटींगचे रिपोर्ट्स येत होते.  बेन किंग्जलेने दात पाडल्याच्या बातम्या आल्या. चित्रपट रिलीज होईपर्यंत त्याबद्दल भरभरून आले.

पण ओरिजिन बद्दल असं काहीही वातावरण नाही. भारताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय झाले याचा आनंद नाही का  ? कि खबरच नाही ? असे कसे होईल ? खबर नाही हे शक्य आहे का ? म्हणूनच अतिचिकित्सक असलेल्या काही आंबेडकरी विद्वानांना आवाहन आहे कि चित्रपट कसाही असू द्यात, आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन टाळा. काही काळ इसापनीती, पंचतंत्राला शरण जा. विद्वत्ता हे सुद्धा शस्त्र आहे आणि शस्त्राचा वापर कसा करावा याचे शहाणपण हे बोधकथांमधून येते. नीती आणि विद्वत्ता एकाच इसमाच्या ठायी असेल असा काही नियम नाही.  एक तर ज्या  महिलेने हा सिनेमा  लिहिला ती कृष्णवर्णिय आहे.  निर्माती सुद्धा कृष्णवर्णिय आहे.  कृष्णवर्णियांचा लढा तिला भारतातल्या जातीय लढ्याशी रिलेट करता आला. एकंदरीतच जगभरातल्या मूळच्या रहिवाशांना बेदखल करून गुलाम बनवणायांच्या विरोधातला हा लढा चित्रपटात मांडताना तिला बाबासाहेब सापडले.   तिला बाबासाहेब समजल्यावर आपलेसे वाटले.  हा प्रचंड मोठा प्लॉट आहे.  शूद्र पूर्वी कोण होते या पुस्तकात जगभरातल्या गुलामीचा आढावा घेतला आहे. तसाच हा प्लॉट असावा असे ट्रेलर पाहून वाटते.  नक्की माहिती नाही.

 या चित्रपटाची सुरूवात होणे आणि साहेबांना इथल्या  मिडीयाने इथे प्रसिद्धी देणे याचा संबंध नसेलच असे नाही. चित्रपट किंवा कोणतीही कलाकृती जी मास कम्युनिकेशनशी निगडीत आहे ती  कुणी जर निर्मिती करत असेल तर किमान आपण त्यात सहभागी व्हायला  पाहीजे.  आपल्या सिनेसृष्टीसाठी संस्था काढत नाही  कृष्णवर्णियांनी त्यांचा  लढा जागतिक सिनेमाद्वारे मांडला.  आपण आपला कधी मांडणार ? सव्वा कोटी जनता आहे.  सरासरी शंभर रूपये देणगी दिली तरी सव्वाशे कोटीमधे चित्रपट बनू शकतो. हे करायचे तर किमान व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप्सने तरी आपण एकमेकांशी बांधलेले असायला हवेत.  तोपर्यंत थोडीशी सहनशक्ती वाढवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्तरावर शक्तिशाली माध्यमातून   झालेत याचा आनंद मानूयात.  जगाने या माध्यमातून बाबासाहेबांमधे रस घ्यायला सुरूवात    केली.  जगभरातल्या सामान्य माणसापर्यंत बाबासाहेब पोहोचतात,  रणनीती पण महत्वाची असते गड्यांनो ! द मूकनायकचे हे भाष्य “बोलके” आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!