देशमहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

नळदुर्ग येथील सिद्धार्थ शिवाजी बनसोडे यांचे UPSC परिक्षेत घवघवीत यश

देशात ९६ वा क्रमांक पटकविला

सर्वत्र अभिनंदन कौतुकांचा वर्षाव

नळदुर्ग

दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग येथील फुले शाहु आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते तथा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा शिवाजी गिरजाप्पा बनसोडे व आदर्श विद्यालय सोलापूर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका निनू शिवाजी बनसोडे – माने यांचे  चिरंजीव सिद्धार्थ शिवाजी बनसोडे हे नुकत्याच पार पडलेल्या संघ लोकसेवा आयोग  युपीएससी परीक्षेमध्ये घवघवीत यश  संपादन करून देशात ९६ वा येण्याचा मान मिळविलेला आहे .

नुकत्याच झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या यू पी एस सी इंजिनियरिंग   सर्व्हिसेस परिक्षे मध्ये घवघवीत यश संपादन केले आसुन देशात ९६ वा क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत .

     सिध्दार्थ बनसोडे यांचे प्राथमिक शिक्षण सिध्देश्वर इंग्लीश मेडीयम स्कुल येथे झाले आसुन त्यांचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्यूसन कॉलेज पुणे येथे झाले आहे . तर पुढील इंजिनियरिंग शिक्षण हे मुंबई येथील के जे सोमय्या अभियंत्रकी महविद्यालयातुन पार पडले आहे .

ते सध्या चन्नई येथे  DRDO मध्ये  शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत . ही नोकरी संभाळत त्यानी संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत देशात ९६ व्या क्रमांकने उतिर्ण झाले आहेत त्यांच्या या यशाबद्दल रिपाईच जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे , प्रमोद कांबळे बापू दुरुगकर , नवनाथ गायकवाड , बौध्दाचार्य दादासाहेब बनसोडे पपू सुरवसे , योगेश सुरवसे , सोनू बनसोडे सह अनेक कार्यकर्त्यानी सर्वस्तरातुन अभिनंदन व कौतुक करत आहेत .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!