मुख्यपानराजकीय

“जरांगे पाटील यांची जाहिर सभा होणार आता चौथ्या टप्यात”

हिंगोली जिल्ह्यातील सभा ही ऐतिहासीक घटना ठरणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची जाहिर सभा हिंगोली जिल्ह्या सोबत विदर्भातील अनेक ठिकाणी घेतली जाणार आहे. त्यामुळे या सभेचा दौरा एकत्रित जाहीर केला जाणार आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील हा चौथा टप्पा असल्याने डिग्रस कऱ्हाळे पाटी येथे घेण्यात येणाऱ्या जाहिर सभेची तारीख लवकरच दिली जाईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधवांना सांगितले.

सकल मराठा समाज बांधवांनी जमीनीचे सपाटीकरण यासह स्वच्छता आदी कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सभेची तारीख निश्चित करण्या करिता २४ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेले होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!