खासदार अमोल कोल्हेंनी मंत्रालयात घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट; राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा

राष्ट्रवादीत बंड होण्यापूर्वी अमोल कोल्हे, सुप्रिया सुळेंसह अजित पवारांच्या निवासस्थानी होते. पण, अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांबरोबर राहण्याचा निर्णय अमोल कोल्हेंनी घेतला होता. आता अमोल कोल्हेंनी अजित पवारांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. पण, मतदारसंघातील विकासकामांबाबत ही भेट असल्याचं अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादीत बंड होण्यापूर्वी अमोल कोल्हे, सुप्रिया सुळेंसह अजित पवारांच्या निवासस्थानी होते, पण…ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री यांच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह कुणाचं? याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. अशातच खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयातील कार्यालयात भेट घेतली आहे. यामुळे चर्चेला उधाण आलं होतं. भेटीनंतर अमोल कोल्हेंनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत