मुंबईतील म्हाडाच्या इमारतीला मध्यरात्री अचानक लागली भीषण आग

मुंबई: 23/11/2023
मुंबईतील म्हाडाच्या इमारतीला मध्यरात्री अचानक आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, तीन पाण्याचे टँकर आणि अग्निशमन दलाच्या इतर गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. ३.४० मिनिटांनी लागलेली आग सकाळी ७.२० वाजता विझवण्यात आली, असं वृत्त पीटीआयने दिलं.
मुंबईतील बहुमजली इमारतीत आज पहाटे भीषण आग लागली. भायखळा पूर्व येथील घोडपदेव विभागातील म्हाडा संकुलातील न्यु हिंद मिल कपाऊंडच्या ३ सी या २४ मजली इमारतीला आग लागली. आग लागल्यानंतर इमारतीतील १३५ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, एक ते चोवीस मजल्यांवरील इलेक्ट्रिक मीटर केबिन, वायरिंग, केबल आणि इलेक्ट्रिक डक्टमधील साहित्यात ही आग लागली. तसंच, १३५ जणांपैकी २५ जणांना इमारतीच्या टेरेसवरून, ३० जणांना १५ व्या मजल्यावरील आश्रयस्थानातून आणि ८० जणांना २२व्या मजल्यावरील आश्रयस्थानातून बाहेर काढण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत