प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपान

पुण्यातील एका वाईन शॉपवर दरोडेखोरांनी हातात कोयता आणि तलवारीचा धाक दाखवत लुटले वाईन शॉप.

पुण्यातील उत्तमनगर भागातील एका वाईन शॉपवर काही दरोडेखोरांनी हातात कोयता आणि तलवारीचा धाक दाखवत वाईन शॉप लुटलं होतं त्यांनी 3 लाखांच्या रोकडसह दारूच्या बाटल्या लंपास केल्या. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, वाईन शॉपवर दरोडा टाकलेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.अटक केलेल्या पाच आरोपींपैकी चार जण अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गावठी कट्टा, कोयता, हत्यार असा तीन लाख 20 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. चार अल्पवयीन मुलांना बाल न्यायमडळात दाखल केले असून एका आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी पाच जणांनी मिळून उत्तम नगर भागात हातात बंदुक, कोयता घेऊन वाईन्स शॉपवर दरोडा घातला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!