देश-विदेशमुख्यपान

मॉरिशसमध्ये २ आणि ३ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलन

तीन दशकांपूर्वी मॉरिशस येथे विश्व मराठी साहित्य संमेलन झाले होते. आता आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलन २ आणि ३ डिसेंबर मॉरिशसला होणार आहेत. या दोन दिवसीय संमेलनाच्या पहिल्या दिवशी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याबरोबरच ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रकाशन आणि प्रदर्शन, आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रम होईल. त्यानंतर ”देशविदेशातील मराठी भाषेचे जतन या विषयावरील परिसंवाद आणि निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. तर संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ”वाचन : बदलता दृष्टिकोन आणि स्वरूप या विषयावरील परिसंवादाबरोबरच मान्यवराच्या मुलाखती तसेच कलाविष्कार व सांस्कृतिक कार्यक्रमांची सत्रे संपन्न होणार आहेत.  मॉरिशस सरकारचं कला आणि सांस्कृतिक वारसा मंत्रालयांतर्गत कार्यरत मराठी स्पीकिंग युनियन, तसेच मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन आणि कोकण मराठी साहित्य परिषद या संमेलनाचं आयोजन करणार आहे.  ज्येष्ठ संपादक, लेखक विजय कुवळेकर संमेलनाचे अध्यक्ष, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे उद्घाटक आणि मॉरिशसमधल्या निशी हिरु या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष आहेत. कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ प्रदीप ढवळ यांनी कणकवलीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!