संविधान रॅली व सभेच्या नियोजना संदर्भात चर्चा.

आज दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी शासकीय विश्राम ग्रह धाराशिव येथे दिनांक 25 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे आयोजित केलेल्या संविधान रॅली व सभेच्या नियोजना संदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी
अशोक हिंगे पाटील- मराठवाडा प्रदेश अध्यक्ष तर प्रमुख उपस्थिती एडवोकेट रमेश गायकवाड – मराठवाडा महासचिव तथा धाराशिव जिल्हा प्रभारी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बी डी शिंदे, जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव, जिल्हा कोषाध्यक्ष विद्यानंद वाघमारे, युवक आघाडीचे जिल्हा महासचिव धीरज शिंदे, तसेच जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष व तालुक्याचे पदाधिकारी, जिल्हा युवक आघाडीचे सर्व पदाधिकारी तसेच आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी अशोक हिंगे पाटील व रमेश गायकवाड यांनी उपस्थित त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले व मुंबईला जिल्ह्यातून हजारो संख्येने कार्यकर्ते घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यानंद वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळासाहेब कदम यांनी मानले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत