अन्यथा एस. पि. ऑफिसवर वंचित काढेल मोर्चा..

दिनांक 20 : अकोला
खदान पोलिस स्टेशन अंतर्गत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी दिरंगाई, निष्काळजी साठी दोषी अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई संदर्भात वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी यांनी ए.एस.पि. अमोल डोंगरे यांच्याशी चर्चा केली आणि
मुलीच्या कुटुंबीयांना संरक्षण मिळावे, १५ दिवसांत तपास पुर्ण करुन चार्जशीट कोर्टात सादर केली जावी या मागण्या पुर्ण न झाल्यास वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असा इशारा वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ते राजेंद्रभाऊ पातोडे यांनी दिला. यावेळी एस पि ऑफिस ला महिला आघाडी प्रदेश महासचिव अरूंधतीताई शिरसाट, जिल्हा अध्यक्ष प्रभाताई शिरसाट,जि प सभापती आम्रपालीताई खंडारे, जि प सदस्य पुष्पाताई इंगळे, महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक, शोभाताई शेळके,सुवर्णाताई जाधव, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे, अकोला तालुका अध्यक्ष मिलिंद दामोदर, श्रीकृष्ण देवकुणबी, तालुका प्रसिध्दी प्रमुख आकाश जंजाळ, वैभव खडसे उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत