महाराष्ट्रमुख्यपान

मुंबईत वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी २७८ बांधकामं थांबवण्याची नोटीस जारी

वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेनं २७८ बांधकामं थांबवण्याची नोटीस बजावली आहे. शहरात सहा हजाराच्या वर बांधकामं होत असून त्यातल्या  दोन हजार ९०० बांधकामांना इशारा नोटीसा बजावल्या आहेत. पालिकेनं वॉर्ड पातळीवर ९५ विशेष पथकंही स्थापन केली आहेत. ही पथकं बांधकाम स्थळांचं परीक्षण करून पालिकेच्या धूळ निवारण मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन करणाऱ्यांना नोटीसा बजावत आहेत. आतापर्यंत  १९० बांधकाम स्थळांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

महानगरपालिकेने शहरात तीन ठिकाणी बाह्य धूळ निवारण केंद्र आणि  धूळ निरीक्षण प्रणाली बसवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही केंद्र जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, दहिसर आणि मुलुंड पथकर नाका इथं सुरू केली जाणार आहेत. पुढच्या महिन्यापर्यंत टप्प्याटप्प्यानं ही प्रक्रिया पूर्ण होईल. ही केंद्र प्रदूषण पातळीचं सतत निरीक्षण करून मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी काम करतील.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!