विज्ञान व इतर शाखेतील विद्यार्थ्यांनी जाती प्रमाणपत्र पडताळणीसाठी प्रस्ताव सादर करावेत .

उपायुक्त बलभिम शिंदे यांचे आवाहन
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
धाराशिव जिल्ह्यातील विज्ञान विभागातील इतर विभागाला ज्याना जाती प्रमाणपत्र पडताळण्याची गरज भासते आहे अशा सर्वच विद्यार्थ्यांनी जाती प्रमाणपत्र पडताळणी साठी आपली प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जाती प्रमाणपत्र पडताळणीचे प्रमुख बलभीम शिंदे यांनी केले आहे
मे जून जुलै मध्ये कुठल्याही विद्यार्थ्यांची हेळसांड होऊ नये म्हणून जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त बलभीम शिंदे आणि १७५४ प्रस्ताव सादर करण्यात आले होते त्या पैकी जलद १७२० प्रकरणे निकाली काढण्यात आली होती उर्वरित प्रकरणासाठी विद्यार्थी व पालकांना सोबत घेऊन त्यांना समजाऊन सांगत आसत ज्य त्रुटी निघाल्या आहेत त्या पुर्ण करण्या करिता समज देत आसतात खूप चांगल्या पद्धतीने जाती प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात उपायुक्त बलभीम शिंदे आणि त्यांची टीम खूप मोठी सेवा विद्यार्थ्याची करित आहेत .
प्रत्येक विद्यार्थाची अडीअडचणी जाणून घेत तो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी त्यांनी खूप चांगले आणी महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत यासाठी सर्व नागरिकांतून आणि पालकांमधून बलभीम शिंदे आणि त्यांचे टीमचं कौतुक होत आहे
धाराशिव जिल्ह्यातील अनेक प्रस्ताव दाखल होतात काही ना काही त्रुटी निघत असतात परंतु जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे प्रमुख बलभीम शिंदे यांनी संबंधित विद्यार्थ्यांनी पालकांशी संवाद साधत एक चांगला समज देऊन नसलेला पुरावा आणण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात या मार्गदर्शनामुळे अनेक पालकांच्या समस्या व अडचनी दूर झालेल्या दिसून येत आहेत यांच्या समवेत कठारे , कोळी , रणदिवे , भुषण माने विशाल, राहुल श्रीमती निकंबे या कर्मचाऱ्यांनी सुद्धा वेळोवेळी विद्यार्थाना मार्गदर्शन करत दिलासा देण्याचा प्रयत्न करत होते धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांना जाती प्रमाणपत्राची गरज आहे अशा विद्यार्थ्यांनी आपले प्रस्ताव लवकरात लवकर जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय येथे सादर करावेत असे आवाहन उपायुक्त बलभिम शिंदे यांनी केले आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत