
आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत कालच्या सामन्यात बांगलादेशनं श्रीलंकेचा तीन गडी राखून पराभव केला. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात श्रीलंकेनं बांगलादेशसमोर विजयासाठी 280 धावांचं आव्हान ठेवलं. चरिथ असलांका यानं 108 धावा काढल्या. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या बांगलादेशनं हे आव्हान 41 षटकं आणि एका चेंडूतच पूर्ण केलं. नजमुल हुसैन शांतो यानं 90, तर शकीब अल हसन यानं 82 धावांची खेळी केली. आज अफगाणिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत