
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल पुण्यात झालेल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेनं न्यूझीलंडचा १९० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत दक्षिण अफ्रिका संघानं निर्धारित षटकांत चार बाद ३५७ धावा केल्या. दक्षिण आफ्रिके कर्णधार टेंबा बावुमा २४ धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर दुसऱ्या गड्यासाठी क्विंटन डी कॉक आणि रेसी व्हान देर दुस्सेन या दोघांनी द्विशतकी भागीदारी केली. डी कॉकनं ११४, तर दुस्सेननं १३३ धावा केल्या. निर्धारित ५० षटकात दक्षिण आफ्रिकेनं ४ गड्यांच्या मोबदल्यात ३५७ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला न्यूझीलंडचा संघ १६७ धावांवर सर्वबाद झाला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत