अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समावेजनापूर्वी वेतनाची शिक्षण आयुक्तांकडे क्रांतीकारी शिक्षक संघटनेची मागणी

सन 2023-24 च्या संच मान्यतेनुसार ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पदे अतिरक्त झाले आहे त्यांचे इतर शाळेत समावेजनापूर्वी वेतन अदा करणे बाबत शासन निर्णय असतांना अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करत नसल्याने क्रांतीकारी शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य सचिव यांनी शिक्षण आयुक्त पुणे यांच्याकडे निवेदन देण्यात आला असून सदरील कर्मचाऱ्यांचे समावेजनापुर्वी वेतन अदा करण्यात यावे म्हणून मागणी केली आहे.
तसेंच मा.शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांच्याकडे तक्रार दिली .यावेळी संघटनेचे संस्थापक सचिव श्री शाहेद कादरी सोबत राज्य कार्याध्यक्ष श्री चव्हाण हनुमंत, पश्चिम महाराष्ट्र विभाग सचिव श्री सय्यद मुस्तफा, पुणे जिल्हा संघटक श्री शेख सोफियान उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत