!! ** माई रमाई * !!*

माता रमाई एका ऊदात्त समर्पनाचे नाव. आदर्श सहचारणी, शालिनतेची विनम्र मुर्ती व अथांग करुणेची महा मेरु म्हणजे माता रमाई.ऊत्तुंग त्यागाचे आदर्श ऊदाहरण..प्रत्येक महापुरुषाच्या पाठीमागे असलेल्या एका स्ञिच्या असीम त्यागाचे मुर्तीवंत रुप म्हणजे माता रमाई.अश्या त्यागाच्या अग्निदीव्यातुनच युग पुरुष घडत असतात.
माता रमाईचा जन्म ७/२/१८९८ ला गरीब परिवारात झाला.व १९०७ ला आंबेडकर घराण्याची सुन व बाबासाहेबांच्या सहचारिनी म्हणुन आपल्या गृहस्थ जिवनाला सुरुवात केली.व एवढ्या कमी वयात त्यांनी योग्यरित्या पुर्ण घराचा सांभाळ केला.
‘गळ्यात एकही दागीना नाही म्हणुन बाया माझी चेष्टा करता व टोचुन बोलतात’ अशी व्यथा एकदा एकदा आमच्या माता रमाई ने पञातुन बाबासाहेबांना कळवली होती.बाबासाहेब या समाजाला अंधार गृहातुन प्रकाशाच्या शिखरावर नेन्याच्या असीम कष्टात आपल्या रामुला अंगभर वस्ञ पण देऊ शकत नव्हते.म्हणुन पञातच रमाईची समझूत काढतांना बाबासाहेब म्हणतात की ‘ रामु कुनालाही मिळाला नाही असा दागिना तुला मिळेल आणि अश्या कोट्यावधी लाकांच्या गळ्यातला दागिना होशील.त्या दु:खाचे आभार मान,दु:ख मानसाला मोठे करतात.
रमाईने आयुष्याच्या महादु:खाचे स्वागत केले.वेदनांचा सत्कार केला.म्हणुन रमाई आज कोट्यावधी लोकांच्या गळ्यातली ताईत/ दागिना बनली.
आज त्या महा मातेला कोटी-कोटी अभिवादन !!!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत