विद्यार्थ्यांची सर्वांगिण प्रगती होण्यासाठी शाळेने केले विशेष प्रयत्न.

पंढरपूर तालुक्यातील चिंचणी येथील जिल्हा परिषद शाळेची व गावाची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांनी चिंचणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली. यावेळी गट विकास अधिकारी प्रशांत काळे उपस्थित होते. भेटीवेळी शाळेची शैक्षणिक गुणवत्ता, शाळेत राबवले जाणारे उपक्रम, विद्यार्थ्यांचे इंग्रजीसह विविध विषयातील उत्तम वाचन पाहून सीईओ मनीषा आव्हाळे भारावल्या. विद्यार्थ्यांची सर्वांगिण प्रगती होण्यासाठी शाळेने केलेले विशेष प्रयत्न ठळकपणे दिसून आले. इंग्रजी माध्यमांच्या शाळांप्रमाणे त्याठिकाणी सर्वच सोयी-सुविधा विद्यार्थ्यांना मिळतात, याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.
सीईओ मनीषा आव्हाळे यांनी विद्यार्थ्यांना शाळेत दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनाची चवही यावेळी घेतली. मध्यान्ह भोजनाचा दर्जा त्यांना उत्कृष्ट असल्याचे जाणवले. भोजनातील भाजी- भात घरी घेऊन नेण्यासारखा स्वादिष्ट बनवल्याचे त्यांनी कौतुकही केले. तसेच शाळेच्या आवारात तयार केलेली परसबाग, ऑक्सिजन पार्क, औषधी वनस्पती, ग्रंथालय याचीही पाहणी केली. चिंचणी गावातील अभ्यासिका, विश्रामगृह, वरदायिनी माता मंदिर, जुन्या वस्तूंचे संग्रहालय, भोजनगृह, स्मशानभूमी अशा ठिकाणांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी मोहन अनपट व ग्रामस्थांचे अभिनंदन केले. चिंचणी गावाच्या विकासामध्ये कायम मदत करण्याची ग्वाहीही सीईओ आव्हाळे यांनी यावेळी दिली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत