मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

नळदुर्ग जिल्हा धाराशिव येथे ऐतिहासिक शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्म रॅलीचे आयोजन.

पूज्य भन्ते भिख्खु संघानंद व पुज्य भन्ते नागबोधी यांची होणार धम्म देसना

नळदुर्ग जि.धाराशिव
दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग या ऐतिहासिक शहरामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रदिप्त मूर्ती सह नळदुर्ग शहरामध्ये समता आणि समानतेचा संदेश देत भव्य धम्मरॅलीचे आयोजन करण्यात आले असून या धम्मारॅलीला परिसरातील खूप मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित राहणार आहेत या धम्म रॅलीसाठी नळदुर्ग शहराच्या नालंदा बुद्धविहारा पासून तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन नालंदा बुद्ध विहार मंडळाच्या वतीने करण्यात येइल पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येईल त्यानंतर भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने समता सैनिक दलाचे सैनिक ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना देतील त्यानंतर धम्म रॅलीला सुरुवात केली जाईल .
यामध्ये अमरदीप लेझीम संघाच्या कलापथकचे नळदुर्ग शहरातील प्रत्येक मोठ्या चौकात लेझीम पथकाचे सादरीकरण होणार असून नळदुर्ग शहरातुन शांत पद्धतीने दोन रांगेत शिस्तबद्ध पद्धतीने धम्मरॅली निघणार असून ही धम्मरॅली बुद्ध विहारापासून सुरुवात होईल किल्ला गेट , क्रांती चौक , ऐतिहासिक चावडी चौक , भवानी चौक , शास्त्री चौक , डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक , अक्कलकोट रोड , बुद्धनगर डॉ आंबेडकर नगर मार्गे भीमनगर नालंदा बुद्ध विहारासमोर या रॅलीची सांगता होणार असून यामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्ष विजयामाला धावारेताई व जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांचे भारतीय बौध्द महासभा शहर पदाधिकारी यांना व्यक्तीगत मार्गदर्शन करणार आहेत या नंतर पुज्य भन्ते भिख्खु संघानंद नागपूर पुज्य भन्ते नागबोधी सोलापूर वैराग यांची बौद्ध उपासक व उपसिका यांना नालंदा बुद्ध विहाराच्या समोर धम्म देसना होणार आहे . याच ठिकाणी भोजनदानाचा कार्यक्रम संपन्न होणार असून यामध्ये पूज्य भन्ते भिख्खु संघानंद नागपूर व पूज्य भन्ते नागबोधी यांना मंडळाच्या वतीने व प्रांजली सत्यवान कांबळे हिच्या वतीने चिवरदानाचा कार्यक्रम होणार असून याच नळदुर्ग शहरातून निघणाऱ्या धम्म रॅलीमध्ये नळदुर्ग येथील भीमनगर बुद्धनगर डॉ आंबेडकर नगर आणि इंदिरानगर शिवाय नळदुर्ग आणी परिसरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!